-
सायकलवरचा पर्यावरणदिन !! – 2
भाग २ स्वच्छ भारत पर्यटन स्थळ !!!!! आम्ही मुद्दामहूनच वेंगुर्ल्याला आमचा मुक्काम ठेवला होता. कारण सुद्धा तसच होतं. मध्यंतरी आम्ही वेंगुर्ला नगरपरिषदेने राबविलेल्या कचरा प्रकल्पाबाबत ऐकले होते. तिथे एवढे नक्की काय आहे ह्याची उत्सुकता आम्हाला इथे घेऊन आली होती. ह्या आधीच्या संपूर्ण प्रवासात पुढे एखादं गाव जवळ आलंय हे आम्हाला रस्त्यांवरच्या पाट्यांच्या आधी रस्त्याच्या कडेला लागलेल्या कचर्याच्या ढिगांमुळे समजत होतं. पण इथे वेंगुर्ल्यात तसं नव्हतं. संपूर्ण गावात स्वच्छं रस्ते आहेत !! विश्वास बसणार नाही पण खरच आम्ही हे अनुभवलं !! एका दुकानदाराशी आम्ही बोलत होतो, जरा माहिती घेत होतो. तो दुकानदार अभिमानाने सांगत होता की आमचे साहेब कार्यालयात नाही, तर एकतर प्रकल्पावर नाहीतर घंटागाडीबरोबर दिसतील !! हे ऐकून ह्यांचे…
-
सायकलवरचा पर्यावरणदिन !! – 1
भाग १ लहानपणी मी रोज शाळेत सायकलनेच जायचो. तेव्हापासून सायकलने इकडे तिकडे फिरायचो, मधूनच सिंहगड, लोणावळा, ताम्हिणी अश्या ठिकाणी सायकलवरून फेरफटका मारून यायचो. पण शाळा संपवून कॉलेज ला गेल्यापासून माझी सायकल अन त्यावरून हुंदडण कुठेतरी मागे राहून गेलं. तसच शाळेत असताना कराटे, किक बॉक्सिंग सुद्धा खेळायचो ते सुद्धा बंद झालं. त्यामुळे व्यायाम अन सायकल दोन्ही बंद होतं. आतमधून कुठेतरी जाणवायला सुरवात झालेली की काहीतरी चुकतंय. तंदुरुस्तीचे तीन तेरा वाजले होते. कळतंय पण वळत नाही असं चालू असताना एक दिवस अचानक माझं आणि अनय चं ठरलं की, उद्यापासून व्यायाम करायचा ( रोज ..!!). व्यायाम फक्त अन फक्त जिम मध्ये जाऊनच होतो असं नाही. आम्ही बागेत- सायकलिंग, धावणे, जोर, बैठका, सूर्यनमस्कार असा…