• Opinion

    सम विरुद्ध विषम

    मूळ मुद्दा हा आहे की सध्याच्या काळात अशी विधाने नैतिकतेला धरून आहेत का? काही वर्षांपूर्वी माझ्या परिचयातील एक व्यक्ती मुलगा होण्यासाठी खूप प्रयत्नं करत होती. एका गुरूंनी सांगितल्यानुसार काढे घेऊन झाले, पूजा-उपवास करून झाले. देव दर्शन यात्रादेखील पूर्ण झाली. प्रयत्नाअंती त्यांना मुलगी झाली. अखेरीस सासूच्या दबावामुळे व मनापासून आराधना न केल्यामुळे प्रयत्नं असफल झाला असा निष्कर्ष काढला गेला. मनूने गर्भधारणेविषयी बरेच काही लिहून ठेवले आहे. त्याच्यानुसार स्त्री संग किंवा संभोग सम तिथीला झाल्यास मुलगा होतो तर विषम तिथीला झाल्यास मुलगी होते. ‘गर्भाधान‘ विधीमध्ये असे करता येऊ शकते. आयुर्वेदातसुद्धा मुलगा होण्यासाठी श्वासोछ्वासवर आधारित उपाय सांगितले आहेत. इंदुरीकर महाराजांच्या मते भागवत धर्मात आणि ज्ञानेश्वरीतही मुलगा होण्यासाठी हेच उपाय सांगितले आहे आणि तेही हेच…